20 फ्रेब्रुवारी रोजी जगभरात अँथ्रोपोलॉजी डे साजरा केला जातो. यादिवशी मनुष्याचा विकास, प्राचीन संस्कृती, भाषा, समाज आणि त्यांच्या वर्तणूकीवर प्रकाश टाकला जातो.
जगातील सर्वात पहिला माणूस कोण होता? असा प्रश्न अनेकांनाच पडला असेल. वैज्ञानिक दृष्टीकोनातून याचं उत्तर जाणून घेऊया.
विज्ञानाच्या अनुषंगाने 'होमो हॅबिलिस' हा जगातील पहिला माणूस होता. यांचे अस्तित्व साधारणपणे 24 लाख वर्षांपूर्वी असल्याचे सांगितले जाते.
दोन पायांवर चालू शकणारा 'होमो हॅबिलिस' हा जगातील पहिला मनुष्य होता.
या मनुष्याचे अवशेष आफ्रिकामध्ये आढळले आहेत आणि हे आपले पूर्वज असल्याचे मानले जाते.
आजच्या काळातील मानवाप्रमाणेच 'होमो हॅबिलिस' हे समाजात राहायचे आणि त्यांच्यात विचार करण्याची क्षमतादेखील होती.
'होमो हॅबिलिस'च्या मेंदूचा विकाससुद्धा जलद गतीने झाला. यामुळे तो हुशार आणि जगातील पहिला मनुष्यप्राणी ठरला.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)