पाकिस्तानमधल्या बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे तिथली अर्थव्यवस्था पूरती ढासळली आहे. सरकार गंभीर समस्यांना सामोरं जावं लागत आहे. महागाईने सामान्या नागरिकाचं कंबरडं मोडलं आहे.

Aug 15,2023


पण अशा परिस्थितीतही पाकिस्तानतल्या काही उद्योगपतींनी आपला लौकिक टिकवून ठेवला आहे. चांगल्या कामगिरीच्या जोरावर हे उद्योगपती सरकारकडे मोठा टॅक्सही भरत आहे.


पाकिस्तानच्या या श्रीमंत उद्योगपतींमध्ये आवर्जुन नाव घेतलं जातं ते इकरा हसन मंशा यांचं. इकरा मंशा या पाकिस्तानमधल्या सर्वात श्रीमंत महिला आहेत.


इकरा हसन मंशा या पाकिस्तानमधले प्रॉपर्टी टायकून मियां उमर मंशा यांच्या पत्नी आहेत. इकरा मंशा या निशात हॉटेल्स अँड प्रॉपर्टीजच्या सीईओआ आहेत.


पाकिस्तानातच नाही तर निशात हॉटेल्स अँड प्रॉपर्टीची लंडनमध्येही फाईव्ह स्टार्स हॉटेल्स आहेत. इकरा मंशा यांची एकूण संपत्ती 1 बिलिअन डॉलर इतकी आहे.


इकरा मंशा यांनी लंडन स्कूल ऑफ ओरिएंटल स्टडीजमधून अभ्यासक्रम पूर्ण केला. हॉटेल्सव्यतिरिक्त इतर अनेक व्यवसायातही इकरा मंशा यांची गुंतवणूक आहे.


पण भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीची तुलना केली. तर इकरा मंशा यांची यांची संपत्ती काहीच नाही


मुकेश अंबानी यांची एकुण संपत्ती 90 बिलिअन डॉलर इतकी आहे. तर गौतम अदानी यांची संपत्ती 55 बिलिअन डॉलर इतक आहे.


इकरा मंशा यांचे सासरे मियां मुहम्मद मंशा हे पाकिस्तानातले पहिले अरबपती व्यापसायीक आहेत. त्यांना पाकिस्तानमधले मुकेश अंबानी असं देखील म्हटलं जातं.


फोर्ब्सच्या यादीनुसार निशात ग्रुप हा कॉटन कपड्यांची निर्यात करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. याशिवाय पॉवर प्रोजेक्टस, सिमेंट आणि बिमा क्षेत्रातही निशात ग्रुपची गुंतवणूक आहे.

VIEW ALL

Read Next Story