परदेशात फिरायला नव्हे, राहायलाच जा! 'हे' देश सहज देतायत नागरिकत्वं
भारतातून परदेशात स्थायिक होणाऱ्यांचा आकडा अतिशय मोठा आहे. काही महिन्यांपूर्वीच देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी माहिती देत गेल्या 12 वर्षांमध्ये 16 लाख नागरिकांनी देशाचं नागरिकत्वं सोडल्याचं सांगितलंय
यंदाच्या वर्षात म्हणजेच 2023 मध्ये तब्बल 65000 नागरिक देशाचं नागरिकत्वं सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. देशातील करप्रणाली आणि तत्सम इतर कारणांमुळं ही वेळ ओढावल्याचं म्हटलं जात आहे.
इथंच काही देशांकडून देण्याच येणारं नागरिकत्वं अशा नागरिकांसाठी मोठ्या मदतीचं ठरत आहे. कारण किमान कागदोपत्री व्यवहार आणि किमान आर्थिक तरतुदींच्या निकषांच्या आधारे हे देश भारतीय नागरिकांना त्यांचं नागरिकत्वं देत आहेत. चला पाहूया असेच काही देश...
कॅरेबियन बेट असणाऱ्या या देशाच्या व्हिसा योजनेचा भाग झाल्यास तुम्हाला 140 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास करता योते. शिवाय या देशाचं नागरिकत्वं मिळाल्यास तुम्हाला मोफक आरोग्य विमा आणि कर सवलतीही प्राप्त होतात.
या देशाचं नागरिकत्व तुम्हाला 140 देशांमध्ये मुक्तसंचाराची परवानगी देतं. शिवाय नागरिकत्वं मिळताच तुम्ही करमुक्त होता. ज्यामध्ये आयकर, संपत्तीवरील करापासून तुम्ही 10 वर्षांसाठी मुक्त होता. शिवाय मोफत शिक्षण, नोकरीसाठीचा व्हिसाही तुम्हाला इथं मिळतो.
पॅसिफिक महासागर क्षेत्रात येणाऱ्या या देशाचं नागरिकत्वं ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूरसह 120 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास करण्याची मुभा देतं. या देशाच्या नागरिकत्वामुळं येथे मोफत शिक्षण, व्यवसाय व्हिसा अशा सुविधा मिळतात.
निसर्गसौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या देशाकडून 130 देशांमध्ये नागरिकांना व्हिसाशिवाय वावरण्याची परवानगी दिली जाते. इथं भूखंडासाठीचा कर न भरता तुम्ही त्याची मालकी मिळवू शकता. ग्रेनेडाच्या नागरिकत्वामुळं अमेरिकेत राहण्याची आणि काम करण्याची परवानगीही मिळते.
अँटीग्वा आणि बारबुडाकडून तब्बल 100 देशांच्या नागरिकांना मोफत व्हिसा दिला जातो. टियर 1 व्हिसासाठी अर्ज करून इथं तुम्ही राहू शकता, नोकरी करु शकता, इथल्या योजनांचा लाभही घेऊ शकता.