फ्लिपकार्टवर खरेदीवर 75% सूट
नवी दिल्ली : 'फ्लिपकार्ट' या ऑनलाईन शॉंपिंग वेबसाईडने ग्राहकांसाठी ऑनलाईन शॉपिंगवर ७५% एवढी सूट दिली आहे. 'बिग अॅप शॉपिंग डेज' या नावाने २३, २४ आणि २५ मार्च या तीन दिवशी हा सेल असणार आहे.
इलेक्ट्रॅानिक वस्तू, मोबाईल्स, कपडे, फूटवेअर, परफ्यूम्स, टीव्ही, घड्याळ, किचन अप्लायन्स, होम थिएटर यासारख्या अनेक वस्तूंवर फ्लिपकार्टकडून सूट देण्यात आली आहे.
फ्लिपकार्टने मोबाईल अॅपच्या प्रसारासाठी ही सूट दिली आहे. या तीन दिवसांच्या सेलमध्ये कोणतेही रजिस्ट्रेशन न करता ग्राहकांना शॉपिंग करता येणार आहे.
फ्लिपकार्टच्या अॅप्लिकेशनवर वस्तू खरेदी केल्यानंतर पेमेंटसाठी अॅक्सिस बँकेतून पेमेंट करताना बॅंकेकडूनही १० टक्के सूट मिळणार आहे.
एका दिवसात सर्वात जास्त शॉपिंग करणाऱ्या ग्राहकाला फ्लिपकार्टकडून 'टॉपर शॉपर' निवडला जाणार आहे, आणि त्याला बुक माय शोतर्फे सिनेमाची तिकीट दिली जाणार आहे.
1800-266-1001 या नंबरवर मिस्ड कॉल देऊनही तुम्ही हे फ्लिपकार्टचं अॅप डाऊनलोड करू शकता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
फ्लिपकार्टवर खरेदीवर 75% सूट
