विराट आणि अनुष्काने यामध्ये गुंतवणूक केली होती. जी आता 9 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली.
गो डिजिटल जनरल इंश्योरन्स लिमिटेडने आयपीओचा प्राइस बॅण्ड 258 ते 272 रुपयांपर्यंत ठेवलाय. हा आयपीओ 15 मेला खुलेल.
विराट आणि अनुष्काने यामध्ये गुंतवणूक केली होती. जी आता 9 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली.
गो डिजिटच्या प्रस्तावित आयपीओनुसार 1125 चे नवे इक्विटी शेअर्स जारी केले जातील. कंपनीमध्ये गो डिजिट इंफोवर्क्स सर्व्हिसेसची 83.3 टक्के भागीदारी आहे.
कंपनी ज्या किंमतीवर आयपीओ आणतेय, त्यापेक्षा खूप कमी किंमतीत विरुष्काने यात गुंतवणूक केलीय. गो डिजिटलमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर त्यांना खूप फायदा मिळण्याची शक्यता आहे.
2020 मध्ये विरुष्काने 75 रुपयांमध्ये हे शेअर्स विकत घेतले होते. त्यावेळी विराटने 2 कोटी 66 लाख 667 इक्विटी शेअर्स खरेदी केले होते. ज्याची किंमत 2 कोटी रुपये इतकी होती.
दुसरीकडे अनुष्काने 50 लाख रुपयांमध्ये 66 हजार 667 इक्विटी शेअर्स खरेदी केले. अशाप्रकारे विरुष्काने मिळून अडीच कोटींची गुंतवणूक यामध्ये केली.
आता गो डिजिटचा आयपीओ येतोय. त्याचे प्राइस बॅण्ड 258 ते 272 रुपये आहे. अशाप्रकारे 4 वर्षात 250 टक्क्याहून अधिक रिटर्न्स मिळू शकतात.
आयपीओ प्राइस बॅण्डच्या हिशोबाने विरुष्काने एकूण रिटर्न 6.56 कोटी रुपये होऊ शकते. या गुंतवणुकीची किंमत वाढून 9.06 कोटी रुपये झाली आहे.
विरुष्काने आपल्या गुंतवणुकीतील कोणता समभाग विकला नाहीय.