सैराट फेम अभिनेत्री रिंकु राजगुरु सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
अभिनेत्रीने व्हॅलेंटाईन डे निमित्त खास फोटोशूट केलं असून तिचे फोटो सोशल मीडियावर तिने शेअर केले आहेत.
यामध्ये अभिनेत्रीने पिंक शेड साडी परिधान केली आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत.
या फोटोमध्ये अभिनेत्रीने लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केला असून हातात लाल रंगाच्या बांगड्या देखील परिधान केल्या आहेत.
तिचा हा लूक चाहत्यांना खूपच आकर्षित करत आहे. तर तिच्या हातात गुलाबाचे फूल देखील दिसत आहे.
अभिनेत्रीने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये Happy Valentie's असं लिहिलं आहे.