'लक्ष्मी निवास' मालिकेतील भावनाचा हळदी समारंभातील लूक सध्या चर्चेत आला आहे.
भावनाने तिच्या बहिणीच्या म्हणजेच जान्हवीच्या हळदी समारंभातील काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये अभिनेत्रीने पिवळ्या रंगाच्या डिझायनर साडीमध्ये एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत.
तिच्या पिवळ्या रंगाच्या साडीला सोनेरी रंगाची भरजरी किनार आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
तर तिने तिच्या हातात सोन्याचा कडा परिधान केला आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सध्या तिचे या हळदी समारंभातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.