संयुक्त अरब आमिरातचा भाग असणारी दुबई आपल्या आकर्षक टॅक्स प्रणालीसाठी देशभरात प्रसिद्ध आहे. खासकरुन उद्योग आणि गुंतवणुकीसाठी येथील टॅक्स स्ट्रक्चर आकर्षक आहे.
दुबईत राहणाऱ्या नागरिकांना कोणताही इन्कम टॅक्स लागत नाही. म्हणजेच त्यांच्या उत्पन्नावर शून्य टक्के कर आहे. यामुळे जास्त पगार असणाऱ्यांसाठी ही एक आवडती जागा आहे.
दुबईत आधी काही कंपन्यांवर कार्पोरेट टॅक्स लावला जात नव्हता. पण 2023 पासून UAE च्या काही कंपन्यांसाठी 9 टक्के कॉर्पोरेट टॅक्स लागू करण्यात आला.
हा टॅक्स फक्त त्या कंपन्यांना लागू होतो, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 3,75,000 AED (जवळपास 88 लाख) पेक्षा अधिक आहे.
दुबईत 2018 च्या आधी काही व्हॅट नव्हता, पण आता 5 टक्के व्हॅट लागू आहे. हा कर सामान आणि सेवांच्या खरेदीवर आहे. आरोग्य, शिक्षा आणि काही खाण्याच्या पदार्थांवर कमी किंवा शून्य व्हॅट आहे.
आयात करण्यात आलेल्या सामानावर 5 टक्के कस्टम ड्युटी लागते. तर तंबाखू, एनर्जी ड्रिंक्स आणि शुगर ड्रिंक्स यांच्यावर 50 ते 100 टक्के कर आकारला जातो. हॉटेलमध्ये राहण्यावर 10 टक्के कर आहे.
दुबईच्या फ्री झोन परिसरातील कंपन्यांना करातून मोठी सूट मिळते. येथे कंपंन्यांना 100 टक्के विदेशी मालकी हक्क आणि 0 टक्के टॅक्स सुविधा आहे.
दुबईत इलेक्ट्रॉनिक टोल रोड सिस्टम आहे, जी टोलमधून गेल्यानंतर आपोआप पैसे कट करते. 1 जुलै 2007 रोजी ही सेवा लाँच करण्यात आली.
दुबईत भाड्याने राहणारे लोक जितकं भाडं देतात त्याचा 5 टक्के (1bhk), 10 टक्के (2bhk) पाणी आणि विजेच्या बिलात जोडून येतं, जे फिक्स्ड असतं.
दुबईत नियम, कायदा फार कडक आहे. जर कोणी त्याचं उल्लंघन केलं तर कडक शिक्षा आणि मोठा दंड आकारला जातो. ज्यामधून दुबईची कमाई होते.