'हे' बॉलिवूड स्टार अडकले होते व्यसनाच्या विळख्यात
भारतीय चित्रपटसृष्टी बाहेरुन जेवढी चमकदार वाटते, तेवढीच ती आतून अंधारमय आहे. ग्लॅमरच्या नावाखाली अनेकांना स्टारच्या आयुष्यातील काळी बाजू दिसतं नाही.
या चमकत्या दुनियेत काही सेलिब्रिटी दारुच्या नशेत, तर कधी ड्रग्जच्या व्यसनात, कोणी सिगारेटच्या धुव्यात अशा वाईट व्यवसांमध्ये बुडून गेली होती.
आज आपण अशाच सेलिब्रिटींबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांना या व्यसनातून बाहेर पडणेही कठीण झाले होते.
या यादीतील पहिलं नाव आहे ते संजय दत्तचं. संजय दत्तला ड्रग्जच्या विळख्याने गाठलं होतं हे प्रत्येकाला माहिती आहे. यातून बाहेर पडण्यासाठी त्याला अमेरिकेच्या पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आलं होतं. असं म्हणतात तो वयाच्या 12 वर्षांपासून या काळा जगात बुडाला होता. त्या डॉक्टराने ड्रग्जची यादी दिली होती. त्यावरील प्रत्येकावर त्याने होची खूण केली होती.
धर्मेंद्र यांनाही एक वाईट व्यसन लागलं होतं. यमला पगला दीवाना 2 या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी त्यांनी कबुली दिली होती की, तेद दारुच्या नशेत बुडाले होते. 2011 मध्ये त्यांची प्रकृती मद्यपानामुळे ढासळल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी दारुला हात नाही लावला.
गायक हनी सिंगदेखली ड्रग्जच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याचा करिअरच्या आलेखही खाली यायला लागला होता. त्याने स्वत: सांगितलं होतं की, 2012 ते 2014 मध्ये तो भयानक रित्या ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याला बायपोलर डिसऑर्डरचा त्रासही झाला होता.
पुढचं नाव आहे ते फरदीन खानचं. त्याला 2001 मध्ये जुहूमधून कोकेनसह अटक झाली होती.
स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर हा देखील ड्रग्जच्या विळख्यात अकडला होता. वयाच्या 13 व्या वर्षी ड्रग्ज घेण्यास सुरुवात केली होती. मात्र त्याने आज या व्यसनावर मात केली आहे.
पूजा भट्टनेही तिच्या वाईट सवयीबद्दल सांगितलं होतं. घटस्फोटानंतर ती वाईट सवयींच्या जाळ्यात अडकली होती.
मनिषा कोईरालादेखील दारुच्या नशेत बुडाली होती. त्यामुळे तिच्या करिअरवर वाईट परिणाम झाला होता.