मोहनलाल यांचा दुबईतल्या बुर्ज खलीफातील 29 व्या मजल्यावर अपार्टमेंट आहे. मल्यालम चित्रपट व्यवसायात सर्वाधिक कर भरणारे ते पहिले अभिनेते आहेत.
मोहनलाल दक्षिणतले एकमेव अभिनेते आहेत, ज्यांना IIFA अॅवॉर्ड मिळाला आहे. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता
अभिनयाव्यतिरिक्त मोहनलाल यांनी अनेक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलं आहे. 2014 मध्ये त्यंनी लालिसन-द-लाल इफेक्ट या म्यूझिक बँडची स्थापना केली. 2015 च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत या बँडने परफॉर्म केलं होतं.
मोहनलाल यांच्या पहिल्या मल्यालम चित्रपटला थेट ऑक्सरसाठी भारताकडून नामांकन मिळालं होतं. या चित्रपटाचं नाव गुरु होतं आणि तो 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता.
2016 मध्ये पुलिमुरुगन, मुन्तिरिवल्लिकल थलिर्ककुम्बोल आणि जनता गॅरेज या चित्रपटांसाठि त्यांना विशेष ज्युरी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
मोहनलाल यांना आतापर्यंत चारवेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यातील तीन पुरस्कार त्यांना त्यांच्या दमदार अभिनयासाठी तर एक पुरस्कार त्यांच्या चित्रपट निर्मितीला मिळाला आहे.
मोहनलाल हे त्वायकांडोमध्येही ब्लॅकबेल्ट आहेत. दक्षिण कोरियात वर्ल्ड त्वायकांडो मुख्यालयात त्यांना 2012 मध्ये ब्लॅकबेल्टने सन्मानित करण्यात आलं होतं. अशी कामगिरी करणारे दक्षिणतले ते पहिले सुपरस्टार आहेत.
मोहनलाल हे व्यावसायिक पहिलवान होते. 1977-78 मध्ये त्यांनी राज्य कुस्ती स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर त्यांची निवड दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपसाठी निवडलं गेलं. पण त्यावेळी त्यांना ऑडिशनसाठी फोन आला.
अभिनेते मोहनलाल यांना 2009 मध्ये लेफ्टनंट कर्नल मानद रँकने गौरवण्यात आलं होतं. असा सन्मान प्राप्त करणारे ते भारताचे पहिले अभिनेता ठरले होते.
भारत सरकारने मोहनलाल यांनी 2001 मध्ये पद्मश्री तर 2019 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं. भारतीय चित्रपटसृष्टीतील अमुल्य योगदानाबद्दल त्यांना गौरवण्यात आलं.
भारतीय अभिनेते, चित्रपट निर्माते, प्लेबॅक सिंगर, फिल्म डिस्ट्रीब्यूटर आणि अभिनेते, अशी विविधअंगी भूमिका मोहनलाल यांनी पार पाडल्या आहेत. मोहनलाल यांनी 400 हून अधिक चित्रपटात काम केलं आहे. यात तामिल, हिंदी, तेलुगु आणि कन्नड भाषांचा समावेश आहे.