नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये गर्दी करु नका. त्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला आहे, असं आवाहन आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी केलं आहे.
2 हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड अशी कागदपत्रं सादर करण्याची गरज नाही असं असबीआयने सांगितलं आहे.
30 सप्टेंबर 2023 पर्यंत नागरिकांनी 2 हजारांच्या नोटा बदलून घ्याव्यात असं आवाहन आरबीआयने केलं आहे.
23 मे पासून बँकांमध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळणार आहेत.
2 हजार रुपयांच्या नोटा आपलं खातं असलेल्या बँकेत जाऊन खात्यामध्ये जमा करु शकता.
एका वेळेस 10 नोटा याप्रमाणे दिवसभरात एका व्यक्तीला कितीही वेळा नोटा बदलून दिल्या जातील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकावेळी 20 हजार रुपयांची रक्कम 2 हजारांच्या चलनात स्वीकारुन त्या नोटा बदलून दिल्या जातील.
एक व्यक्ती 2 हजारांच्या 10 नोटा एकावेळी बदलून घेऊ शकते.
आरबीआयच्या कोणत्याही रिजनल ऑफिसमध्ये जाऊन 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून घेता येतील. आरबीआयची देशात एकूण 19 रिजन ऑफिसेस आहेत.
ज्या बँकेत तुमचं खातं आहे त्याच बँकेतून तुम्हाला नोटा बदलून मिळत असं काहीही नाही. तुमच्या सोयीनुसार जवळच्या कोणत्याही बँकेत तुम्ही नोटा बदलण्यासाठी जाऊ शकता.
तुम्ही तुमच्या घराच्या जवळ असलेल्या कोणत्याही बँकेमधून 2 हजारांच्या नोटा बदलून घेऊ शकता.