रविंदर चंद्रशेखरनला अटक

16 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) निर्मात्याला अटक केली आहे चंद्रशेखरन यांच्याविरोधात चेन्नई सेंट्रल क्राइम ब्रँचमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.

Sep 09,2023

नेमकं प्रकरण काय?

ऑक्टोबर 2020 मध्ये लिब्रा प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे ​​39 वर्षीय रविंदर चंद्रशेखरन यांनी 'माडव मीडिया प्रायव्हेट लिमिटेड'च्या बालाजी कापा यांच्याकडे व्यवसायाचा प्रस्ताव ठेवला होता.

काय होती तक्रार?

पालिकेच्या घनकचऱ्याचे ऊर्जेत रूपांतर करण्याचा हा प्रस्ताव होता, त्यासाठी त्यांनी बालाजी कपा यांच्याकडे आर्थिक मदत मागितली होती.

15.83 कोटी रुपयांचा झाला होता व्यवहार

17 सप्टेंबर 2020 रोजी गुंतवणूक करारावर स्वाक्षरी करण्यात आली आणि निर्मात्याला 15.83 कोटी रुपये देण्यात आले. मात्र त्यानंतर त्यांनी ना व्यवसाय सुरू केला ना पैसे परत केले.

रविंदर चंद्रशेखरन न्यायालयीन कोठडीत

निर्माता रविंदर चंद्रशेखरन याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

दुसऱ्या लग्नामुळे ट्रोल

चंद्रशेखरन याचे नाव वादात येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी 2022 मध्ये त्यांनी अभिनेत्री महालक्ष्मी शंकरसोबत दुसरे लग्न केले होते, ज्यासाठी त्यांना खूप ट्रोल करण्यात आले होते.

महालक्ष्मीचेही हे दुसरे लग्न

याआधी चंद्रशेखरन लग्न आर. हे शांतीसोबत झाले होते, जे फार काळ टिकले नाही. महालक्ष्मीचेही चंद्रशेखरनसोबत हे दुसरे लग्न होते

पैशासाठी केले लग्न

लग्नानंतर, जेव्हा त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, तेव्हा अभिनेत्रीने पैशासाठी निर्मात्याशी लग्न केले असे म्हटलं जात होतं.

VIEW ALL

Read Next Story