भारतातील हिंदी चित्रपट सृष्टीला बॉलिवूड म्हटलं जातं तर अमेरिकेच्या चित्रपट सृष्टीला हॉलिवूड म्हटलं जातं.
पण तुम्हाला माहितीये का पाकिस्तानची चित्रपट सृष्टी कोणत्या नावाने ओळखली जाते.
पाकिस्तानची नाटक, चित्रपट आजकाल जगभरात खूप लोकप्रिय होतं आहेत. भारतात देखील अनेक लोक याचे चाहते आहेत.
पाकिस्तानच्या चित्रपट सृष्टीचे नाव देखील भारताच्या बॉलिवूड या नावाशी मिळतं जुळतं आहे.
पाकिस्तानमध्ये उर्दू आणि पंजाबी या दोन भाषा प्रामुख्याने बोलल्या जातात. त्यामुळे पाकिस्तानचे बहुतांश चित्रपट याच दोन भाषेत प्रदर्शित केले जातात.
भारतात जसे बॉलिवूडचे सेंटर मुंबई (पूर्व नाव - बॉम्बे) आहे. तसेच पाकिस्तानच्या चित्रपट सृष्टीचे प्रमुख शहर लाहोर आहे.
त्यामुळे पाकिस्तानच्या चित्रपट सृष्टीला लॉलिवूड (Lollywood) असे म्हटले जाते.