बॉलिवूडची धकधक गर्ल अशी ओळख असलेली अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ हा चित्रपट५ जानेवारीला प्रदर्शित झाला आहे.
या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्पर तोड कमाई केली आहे.
नुकतंच माधूरी दिक्षीतने एक फोटोशूट तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे.
या फोटोत माधूरी दिक्षित ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.
यावेळी माधूरीने पिवळ्या रंगाचा ड्रेस त्यावर गोल्डन रंगाचं सुंदर वर्क असलेला ड्रेस परिधान केला होता.
यावेळी माधूरीने हेव्ही मेकअप आणि केसांची सिंपल हेअर स्टाईल करत गोल्डन कलरचे कानातले या लूकसाठी निवडले आहेत.
माधूरीने इन्स्टाग्रामवर तिचे हे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. अवघ्या काही वेळातच अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.