महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब कॉमेडी आणि तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
सध्या अभिनेत्री तिच्या 'मंगला' चित्रपटामुळे खूपच चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिने BTS व्हिडीओ शेअर केला होता.
ज्यामध्ये तिने या चित्रपटाच्या पडद्यामागच्या काही गोष्टी शेअर केल्या होत्या.
तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती मुलांना संगीताचे धडे देताना दिसत आहे. तर दुसरीकडे ती गायन करताना दिसत आहे.
ज्यामध्ये तिला एक सीन फक्त एका श्वासात करायचा होता आणि तिने करून दाखवला. हे पाहून चित्रपटाच्या दिग्दर्शिका यांनी थेट शिवाली समोर हात जोडले.
अभिनेत्रीने मंगला हे पात्र मला खूप काही शिकवून गेलं असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तिच्या या BTS व्हिडीओवर कौतुकांचा वर्षाव होतोय.
शिवाली परबला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. तिचे लाखो चाहते आहेत.