सलमान सध्या अरहान खानच्या पॉडकास्टमुळे खूप चर्चेत आहे.
अरहान खानच्या पॉडकास्टमध्ये बोलताना सलमानने अनेक गोष्टींबाबत खुलासा केलाय.
अरहान खान जेव्हा खूप लहान होता तेव्हाचा एक किस्सा सलमानने सांगितला.
सोशल मिडियावर सगळीकडेच या संवादाची चर्चा केली जात आहे.
साल 2010 मध्ये सलमान आणि अरबाज खानचा 'दबंग' चित्रपट प्रदर्शित झाला होता.
या चित्रपटात सलमान अरबाजला मारत आहे असा एक सीन होता.
हा सीन छोट्या अरबाजने पाहिला आणि चक्क काका म्हणजेच सलमानशी बदला घ्यायला निघाला.
त्यानंतर सलमानने अरहानला नीट समजावलं की तो चित्रपटातील सीन होता, त्याला मी खरोखर मारलेलं नाही.