बाळ किती महिन्याचं झाल्यावर त्याला दही आणि ताक द्यावं ?

May 15,2024

नाजूक पचनशक्ती

नवजात बालकाची पचनशक्ती नाजूक असते.

आईचं दूध

म्हणूनच सुरुवातीचे काही महिने बाळाच्या आरोग्यासाठी आईचं दूध सर्वश्रेष्ठ मानलं जातं.

फळं आणि भाज्या

साधारणत: चार ते पाच महिने पूर्ण झाल्यावर बाळाला दूधाव्यतिरिक्त फळं आणि भाज्यांचं रस दिला जातो.

पाच महिने

आरोग्यतज्ज्ञांच्या माहितीनुसार पाच महिने पूर्ण झाल्यावर बाळाची पचनशक्ती वाढते.

दह्याचा समावेश

त्यामुळे त्याच्या आहारात दह्याचा समावेश केल्यास फायदेशीर ठरतं.

घरी तयार केलेलं दही

सहसा घरी तयार केलेलं दही हे बाळासाठी आरोग्यवर्धक मानलं जातं.

पचनसंस्था

दह्यात असलेल्या लॅक्टिक अ‍ॅसिडमुळे बाळाची पचनसंस्था सुधारते.

दही आणि ताक

दही आणि ताकामध्ये प्रोटीन आणि कॅल्शिअमची मात्रा मुबलक असल्याने पोटाशी संबंधित आजारांवर गुणकारी मानलं जातं.


दही आणि ताकाचा बाळाच्या आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story