मारुती इको देशातील दहावी सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. कंपनीने एप्रिल महिन्यात 12 हजार 60 युनिट्सची विक्री केली आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात विक्री झालेल्या 10 हजार 504 युनिट्सच्या तुलनेत 15 टक्के वाढ झाली आहे.
मारुती अर्टिगाच्या 13,544 युनिट्सची विक्री झाली आहे. गतवर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत विक्रीत 145 टक्के वाढ झाली आहे. ही कार नवव्या क्रमांकावर आहे.
मारुतीची प्रिमिअम हॅचबॅक बलेनोला 14,049 ग्राहक मिळाले आहेत. गतवर्षी एप्रिल महिन्यात 16,180 युनिट्सची विक्री झाली होती. त्या तुलनेत विक्रीच 13 टक्के घट आहे.
मारुती फ्राँक्स विक्रीत सातव्या क्रमांकावर आहे. एप्रिलमध्ये कारच्या एकूण 14,286 युनिट्सची विक्री झाली. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ 63 टक्के आहे.
एप्रिलमध्ये महिंद्रा स्कॉर्पिओच्या एकूण 14,807 युनिट्सची विक्री झाली आहे. गतवर्षीच्या 9617 युनिट्सच्या तुलनेत ही वाढ 54 टक्के आहे.
हुंडाई क्रेटा पाचव्या स्थानी आहे. एप्रिल महिन्यात एसयुव्हीच्या 15, 447 युनिट्सची विक्री झाली. ही वाढ गतवर्षीच्या तुलनेत 9 टक्के आहे.
मारुती डिझायर टॉप 10 लिस्टमध्ये एकमेव सेडान आहे. कंपनीने एकूण 15,825 युनिट्सची विक्री केली आहे. गतवर्षी विक्री झालेल्या 10,132 युनिट्सच्या तुलनेत ही वाढ 56 टक्के आहे.
मारुतीची ही प्रसिद्ध एसयुव्ही तिसऱ्या स्थानी आहे. कंपनीने याच्या एकूण 17,113 युनिट्सची विक्री केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत 45 टक्के वाढ झाली आहे.
टाटा पंच देशातील सर्वात जास्त विकली जाणारी कार ठरली आहे. कंपनीने एकूण 19,198 युनिट्सची विक्री केली. गतवर्षीच्या 10,934 युनिट्सच्या तुलनेत ही वाढ 75 टक्के आहे.