एरोबिक व्यायाम जसे की जलद चालणे, सायकलिंग, पोहणे हा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आणि संपूर्ण आरोग्य राखण्याचा एक मूलभूत मार्ग आहे.
दर आठवड्याला किमान 150 मिनिटे मध्यम एरोबिक व्यायाम किंवा दर आठवड्याला 75 मिनिटे उच्च-तीव्रतेचा व्यायाम करणे गरजेचे आहे.
पण व्यायामाच्या तीव्रता व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असू शकते. एका व्यक्तीसाठी ‘अत्यंत तीव्र’ व्यायाम दुसऱ्यासाठी ‘मध्यम’ असू शकतो.
तसेच व्यायामाच्या गतीवर हृदयाची गतीही अवलंबून असते. तसेच हृदयाच्या गतीवर तापमान, औषधे आणि तणाव पातळी यांचाही परिणाम होऊ शकतो.
ज्यामुळे व्यायामादरम्यान खर्च होणारी ऊर्जा ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. उच्च-तीव्रतेच्या व्यायामादरम्यान, शरीर प्राधान्याने कर्बोदकांचा वापर करत असते.
या दरम्यान, ऊर्जेची मागणी जास्त असते आणि कर्बोदके चरबीपेक्षा दुप्पट वेगाने ऊर्जा देतात. कर्बोदकांचा वापर झाल्याने रक्तशर्करा संतुलित राहते.
रक्तातील कॉलेस्टरॉल कमी होते. ज्याचा परिणाम हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यावर होत असतो.