कोणी रडत असेल तर आपण त्याला तात्काळ थांबवतो. आणि रडू नको, असा सल्ला देतो. मग दे लहान मुल असो किंवा मोठी व्यक्ती.
पण रडणं ही सामान्य क्रिया आहे. जी अनेकदा भावना किंवा इतर कारणाने येते.
रडण्याने तुमच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर चांगला परिणाम होतो.
डोळ्यातून निघालेल्या अश्रूंमध्ये कॉर्टिसोल हार्मोन असते. हे स्ट्रेस हार्मोन असते. रडल्याने स्ट्रेस हार्मोन बाहेर पडले तर तणाव दूर होतो.
अनेकदा दु:खात असलेल्यांना भूक कमी लागते. रडल्याने कॅलरी बर्न होते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
हमसून हमसून रडल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते. यामुळे तुमचा मूड चांगला राहतो.
डोळ्यात धूळ-कचरा गेल्याने डोळ्यात पाणी येतं. यामुळे डोळ्यातील घाण बाहेर येते.
अनेकदा आनंदाच्या भरातही डोळ्यात अश्रू येतात. ज्यामुळे भावना संतुलित राहतात.
अश्रुंमध्ये ऑक्सिटॉसिन आणि एंडोफिर्न असते. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.