रोज उपाशीपोटी काळीमिरी खाल्ल्यास काय होईल?

Feb 06,2024


पोटासंबंधी किंवा पचनासंबंधी समसेयांपासून आराम मिळवायचा असेल तर काळी मिरीचे सेवन करा. काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. काळी मिरी बर्‍याच रोगांमध्येही हे प्रभावी मानली जाते.


काळी मिरीमध्ये लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, क्रोमियम, व्हिटामिन ए आणि इतर पोषक औषधी गुणधर्म आढळतात. या कारणांमुळे स्वादासह काळी मिरी आपल्या आरोग्यासाठीही लाभदायक आहे.


जर तम्हाला वारंवार खोकल्याचा त्रास होत असेत तर काळीमिरीचं सेवन करून तुम्ही या समस्येतून मुक्त होऊ शकता. दिवसभरात 3 ते 4 काळीमिरी खाल्याने फरक दिसून येतो.


अपचनाची समस्या निर्माण होत असेल तर, लिंबाचा अर्धा तुकडा घेऊन त्यातील बिया काढून टाका. त्यात काळे मीठ आणि मिरपूड भरून गरम करा आणि चोखा. याने अपचनाची समस्या दूर होईल.


फुफ्फुसात आणि श्वसन नलिकांमध्ये संसर्ग झाल्यास आपण काळीमिरी आणि पुदीना युक्त चहा पिऊ शकता. सतत खोकल्यामुळे त्रास होत असल्यास, काळीमिरीच्या 4-5 दाण्यांसह 15 मनुका चावून खाल्ल्याने आराम मिळेल.


जर घसा बसला असेल, तर तूप, साखर आणि मिरपूड मिसळून त्याचे चाटण तयार करा त्यामुळे तुमच्या घश्यातील बॅक्टेरिया मरतात आणि तुम्हाला होणारा त्रास कमी होऊ शक्तो.

VIEW ALL

Read Next Story