इवल्याश्या कंटोळीचे अनेक फायदे, गंभीर आजारांपासून करते तुमचं रक्षण
Benefits of Spiny Gourd : पाहा या इवल्याश्या कंटोळीचे अनेक फायदे... पावसाळ्यात या रानभाजीची चव चाखायलाच हवी.
कर्टुल किंवा कंटोळी सहसा पावसाळ्याच्याच दिवसांमध्ये आढळते. रानावनातून येणारी ही भाजी सहसा गावठाणांच्या ठिकाणी अगदी सहजपणे उपलपब्ध असते. शहरात तिच्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागतात.
या कंटोळीच्या भाजीमुळं पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. आयुर्वेदातही या भाजीचा अनेक रोगांवरील उपचार म्हणून वापर केला जातो.
कंटोळीमध्ये असणाऱ्या अँटीअॅलर्जीक तत्त्वांमुळं सर्दी खोकल्यापासून बचाव होतो. शिवाय डोळ्यांचे आजार, हृदयरोग यांपासून आपण दूर राहतो.
कंटोळीमध्ये मोमोरडीसिन आणि फायबर ही तत्त्वं असल्यामुळं ते अॅन्टीऑक्सिडंट, अँटीडायबिटीजचं काम करतात. ज्यामुळं वजन आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.
कंटोळीमध्ये लोह, प्रोटीन्सचं प्रमाण जास्त असतं. परिणामी 100 ग्रॅम कंटोळीच्या भाजीतून 17 कॅलरी मिळतात. त्यामुळं वजन कमी करण्यासाठी ही भाजी फायद्याची.
कंटोळीच्या भाजीमध्ये असणारे गुणधर्म शरीरासाठी अतिशय फायद्याचे असतात. ज्यामुळं ही भाजी शरीराला अनेक व्याधींपासून दूर ठेवते.