काय? रडण्याचेही असतात फायदे? जाणून व्हाल हैराण
मनमोकळेपणाने हसल्याने आरोग्यास फायदा होता, हे सगळ्यांना माहिती आहे. पण रडण्यामुळेही आरोग्याला फायदा होतो हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर माग जाणून घेऊया रडण्याचे फायदे...
रडण्यामुळे आपले इमोशन्स बाहेर पडण्यास मदत होते. तीव्र भावनिक गुंतागुंत रडण्यामुळे दूर होण्यास मदत होते.
रडल्यामुळे शरीरातील स्ट्रेस हॉर्मोन्स निघून जातात ज्यामुळे ताणतणाव दूर होतो. त्यामुळे तुमचा मूडही चांगला होतो.
रडण्यामुळे आपल्याला आपल्या भावना जास्त चांगल्या रीतीने समजण्यास मदत होते.
रडणं आपल्याला परिस्थितीबद्दल चांगलं वाटण्यासाठी मदत करतं. रडल्याने मनावरचं ओझं कमी होऊन आपल्याला आपोआप चांगलं वाटू लागतं.
नुकत्याच एका संशोधनानं हे सिद्ध झालंय की, ज्याप्रमाणे घामावाटे आणि लघवीवाटे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. तसंच, अश्रूंद्वारेही आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.
आपल्या जवळच्या व्यक्तिसमोर रडल्याने बॉंडिंग अजून घट्ट होतं. सहानुभूती आणि पाठिंबा दर्शवण्याचा अश्रू हा एक उपाय आहे.
नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी अनेकजण औषधं आणि योगा इत्यादींची मदत घेतात. मात्र, अशावेळी रडणं हा उत्तम उपाय मानला जातो. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)