वारंवार तहान लागते? 'या' Vitamin ची असू शकते कमतरता

Feb 05,2025


माणूस जेवणाशिवाय काही दिवस राहू शकतो. मात्र, पाण्याशिवाय त्याचा एक दिवससुद्धा जाऊ शकत नाही. कारण, पाणी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते.


आहारतज्ज्ञ आणि डॉक्टरसुद्धा तुम्हाला दिवसभरात भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. परंतु, असे बरेचजण आहेत ज्यांना प्रमाणापेक्षा जास्त तहान लागते.


अशावेळी आवश्यकतेपेक्षा अधिक तहान लागणे हे कशाचे लक्षण आहे? असा प्रश्न डोके वर काढतो आणि एखाद्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे जास्त तहान लागत असावी, असा अंदाज बांधला जातो.


खरंतर, आवश्यकतेपेक्षा जास्त तहान लागणे हे व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे नव्हे तर शरीरात व्हिटॅमिनचे अधिक प्रमाण असल्याचे लक्षण आहे.


तुमच्या शरीरातील 'व्हिटॅमिन डी' चे अधिक प्रमाण हे आवश्यकतेपेक्षा जास्त तहान लागण्याला कारणीभूत असते.


शरीरातील 'व्हिटॅमिन डी' चे जास्त प्रमाण असल्यास त्याला 'हायपरविटामिनोसिस डी' असे म्हणतात. यामुळे 'हायपरकॅल्सिमिया' हा आजार उद्भवू शकतो.


मर्यादेपेक्षा जास्त तहान लागण्याला 'पॉलिडिप्सिया' असे म्हणतात आणि ही गंभीर समस्या असल्याचे सांगितले जाते.


शरीरात 'व्हिटॅमिन डी' चे अधिक प्रमाण असण्याव्यतिरिक्त जास्त मसालेदार पदार्थ, अधिक प्रमाणात कॅफिन आणि मद्याचे सेवन हेदेखील वारंवार तहान लागण्याला कारणीभूत असतात.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story