टोमॅटो डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असून यामध्ये ल्युटीन, लाइकोपीन नावाचे घटक असतात. जे दृष्टी वाढवण्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स डोळे निरोगी ठेवतात, डोळ्यांची पाहण्याची क्षमता वाढवतात.
डोळ्यांचा कोणत्याही आजारापासून बचाव करायचे असेल तर भाज्यांमध्ये ब्रोकोलीचा समावेश करणे गरजेचे आहे. ब्रोकोली रेटिनाला कोणत्याही प्रकारच्या रॅडिकलपासून मुक्त ठेवण्यासाठी प्रभावी ठरु शकते. भाज्यांमध्ये असलेले सल्फोराफेन डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.
डोळ्यांसाठी ताजी फळे आणि गर्द हिरव्या पालेभाज्या त्यात सी आणि ईसारखी अधिक अँटीऑक्सिडेंट जीवनसत्त्वे असतात, त्यापेक्षा जास्त फायदेशीर असतात. अँटीऑक्सिडेंट डोळ्यांचे मोतीबिंदू आणि वयानुसार येणाऱ्या कमकुवकपणापासून संरक्षण करतात.
डोळ्यांची कमकुवतता इत्यादी रोगांमध्ये बदाम टॉनिक प्रमाणे काम करते. रात्री आठ बदाम भीजवून सकाळी बारीक करुन पाण्यात मिसळून प्या. असे केल्याने डोळे निरोगी राहतील आणि डोळ्यांवरील चष्मा देखील उतरेल.
डोळ्यांची नजर मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही मासे खाऊ शकता. यामध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी अॅसिड डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने डोळ्यांच्या कोरडेपणाची समस्या निर्माण होत नाही.
गाजर डोळ्यांसाठी फायदेशीर असून त्यामध्ये व्हिटॅमिन ए मुळे, जे केवळ आपल्या डोळ्यांच्या आरोग्याचे रक्षण करत नाही तर रात्री अंधत्व आणि वयोमानामुळे दृष्टी कमी होण्यापासून देखील संरक्षण करते.
डोळे निरोगी ठेवण्यासाठी पोषक तत्वे आवश्यक आहेत. तसेच अंड्यांमध्ये ल्युटीनसारखे अँटीऑक्सिडेंट असते. जे रेटिनाला निरोगी ठेवण्यास मदत करते. वाढत्या वयात रोज एक अंडे खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टीही वाढते.