नारळपाणी सर्वांसाठीच फायद्याचं असतं असं नाही
उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरामधील पाण्याचा स्तर कमी होणार नाही आणि बॉडी डिहायड्रेट होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागते.
उन्हाळ्यामध्ये वाढत्या उष्णतेला आणि डिहायड्रेशनचा त्रास टाळण्यासाठी अनेकजण पौष्टीक खाण्याबरोबरच जास्त प्रमाणात पाणीही पितात.
अनेकजण उन्हाळ्यामध्ये नारळपाणी पिण्यासही प्राधान्य देतात.
नारळपाण्याचे बरेच फायदे आहेत यात काहीच शंका नाही. मात्र काहीवेळा नारळपाण्याचा काही लोकांच्या प्रकृतीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
किडनीसंदर्भातील व्याधी असलेल्या लोकांनी नारळपाण्याचं सेवन करु नये. अशा लोकांना नारळपाण्याचा त्रास होऊ शकतो.
अधिक प्रमाणात नारळपाणी प्यायल्याने रक्तदाब वाढण्याची शक्यताही असते. त्यामुळे रक्तदाबासंदर्भातील समस्या असेल तर नारळपाण्याचं अतिसेवन करु नये.
ज्या लोकांना पोटॅशियमची कमतरता आणि इतर त्रास असतात त्यांनी नारळपाणी पिऊ नये.
अशा लोकांच्या शरीरामधील इलेक्ट्रोलाइटचं प्रमाण हे कायम चिंतेचा विषय असतं. नारळपाण्याचं सेवन केल्याने त्याचं संतुलन बिघडू शकतं.
सरसकट सर्वांसाठी नारळपाणी फायद्याचे असते हा तुमचा भ्रम या माहितीच्या आधारे दूर होईल.