सुंदर डोळे हे तुमच्या सौंदर्यात भर टाकतं. काही लोकांना चष्मा लावावा लागतो. अशामध्ये डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी आहारात 5 सुपरफूड समावेश करा.
गाजरमधील व्हिटॅमिन ए आणि रोडोपसिनचे प्रमाण जास्त असलेल्या रीजेंट फळाचं नियमित सेवन केल्यानं तुमच्या डोळ्यांचं आरोग्य सुधारतं.
भोपळा आणि पपई, ही दोन फळं व्हिटॅमिन ए ने भरपूर असल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
हिरव्या पालेभाज्या, ज्यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असल्याने तुमचं डोळे दीर्घकाळ निरोगी आणि तरुण राहण्यास मदत मिळते.
व्हिटॅमिन बी 1 समृद्ध असलेले अन्न तणाव आणि थकवा यांच्या प्रभावापासून डोळ्यांचं संरक्षणासोबत कोरडेपणा आणि जळजळ कमी करते. त्यासाठी मटार, काजू, बदाम आणि अंकुरलेली कडधान्ये खावं.
लिंबू, संत्री आणि द्राक्षे यांसारखी लिंबूवर्गीय फळे आणि व्हिटॅमिन सी हे डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत करतात.
तुमच्या आहारात ओमेगा-3 समृद्ध असलेले पदार्थ मासे, चिया सीड्स, फ्लैक्स सीड्स आणि हैंप सिड्स समावेश करा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)