दुधात कॅल्शियम असते. जे शारीरिक विकास आणि हाडांच्या मजबुतीसाठी चांगले असते.
बॅलेन्स डाएटसाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.
काही लोक दिवसाची सुरुवात दूध पिऊन करतात तर काहीजण रात्री दूध पितात.
पण दूध पिण्याची योग्य वेळ कोणती तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया.
तुमच्या शारीरिक ठेवण आणि वय यावर दूध पिण्याचा योग्य वेळ ठरते, असे तज्ञ सांगतात.
काहींसाठी सकाळी दूध पिणं फायदेशीर ठरतं तर काहींसाठी रात्री.
जे लोकं जास्त वर्कआऊट करतात, त्यांच्यासाठी सकाळी दूध पिणं चांगलं असतं.
रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याचे तुम्हाला खूप फायदे मिळतात.
झोपण्याआधी दूध प्यायल्यास झोप चांगली लागते आणि तुम्हाला कॅल्शियमदेखील मुबलक प्रमाणात मिळते.