शरीरातील हॅपी हार्मोन्स ठरवतात आनंदाचं गणित; 'या' पदार्थांमध्ये दडलाय त्यांचा मोठा खजिना

Diksha Patil
Aug 03,2023

हॅपी हार्मोन

हॅपी हार्मोन जर आपल्या शरीरात जास्त असतील तर आपण आनंदी राहतो आणि ते नसतील तर आपली चिडचिड होते आणि आपलं कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. कोणत्या गोष्टींचे सेवन केल्यानं हॅपी हार्मोन वाढतात जाणून घेऊया...

ब्लूबेरी

ब्लूबेरीचा आहारात समावेश केल्यास हॅपी हार्मोन वाढतात. त्याचे कारण म्हणजे त्याच्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स.

हिरव्या पालेभाज्या

आपल्या आहारात फक्त फीट राहण्यासाठी तर त्यासोबत आनंदी राहण्यासाठी देखील हिरव्या पालेभाज्यांचे सेवण करणे गरजेचं आहे कारण त्यानं हॅपी हॉर्मोन वाढतात आणि आपण चिंता मुक्त होतो.

टोमॅटो

टोमॅटोचे दर वाढतच असल्यानं आपण खरेदी करताना हजारवेळा विचार करतो. मात्र, हाच टोमॅटो आपल्या मनाला शांत करते आणि आपण आनंदी राहतो.

गाजर

अनेकांना त्यांच्या सॅलेडमध्ये गाजर खाण्याची सवय असते. गाजर फक्त आपल्या डोळ्याचे आरोग्य चांगलं करत नाही तर त्यासोबतच आपल्याला आनंदी देखील ठेवतो.

शिमला मिरची

शिमला मिरची अशी फळभाजी आहे, जी अनेकांना आवडत नाही. ही भाजी अनेकांना फक्त चायनीज जेवणात आवडते इतरं त्यांना आवडत नाही. पण शिमला मिर्च खाल्यानं हॅपी हॉर्मोन वाढतील आणि तुम्ही आनंदी रहाल.

डार्क चॉकलेट

फक्त चॉकलेट नाही तर डार्क चॉकलेट हे आपल्याला स्ट्रेस आणि नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करते. त्यात जे कोको असते ते एंडोर्फिन सोडते त्यामुळेच हॅपी हॉर्मोन वाढतात.

नट्स

नट्स म्हणजेच ड्रायफ्रुट देखील तुम्हाला आनंदी राहण्यात मदत करतात. (All Photo Credit : Freepik)

VIEW ALL

Read Next Story