दूध आणि मखाने खाणं आरोग्यवर्धक आहे, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.
पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी दुधात मखाने टाकून खाल्याने शरीराला फायदा होतो.
पावसाळ्यात आणि थंडीत संधीवाताचा त्रास अनेकांना होतो. मखाने आणि दुधात कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असतं, त्यामुळे हाडांचं आरोग्य सुधारतं.
जर तुम्हाला सतत थकवा येत असेल तर तुम्ही दूध आणि मखान्यांचं सेवन करु शकता. यामुळे शरीराला पोषक घटक मिळतात.
तुम्हाला वजन कमी करायचं असल्यास तुम्ही मखाने आणि दुधाचं सेवन करु शकता. यामुळे झटपट वजन कमी करण्यास मदत होते.
मखान्याचं सेवन केल्याने अनेक शारीरिक व्याधी दूर होतात.
पोट साफ न होणं किंवा सतत गॅस होत असेल तर मखान्यांचा आहारात समावेश करावा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)