असं म्हणतात की कोणत्याही व्यक्तीच्या मनाची वाट पोटावाटे जाते. त्यातही जेवण आवडीचं असल्यास दोन घास जास्त जातात.
एखाद दिवशी आवडीचं जेवण नसल्यास मात्र पोट लवकर भरतं. असं का होतं माहितीये?
शरीरात जेव्हाजेव्हा एखाद्या पोषक तत्त्वाची कमतरता होते तेव्हातेव्हा अमुक पदार्थ खावासा वाटतो.
शरीर तेव्हा भूक भागल्याचे संकेत देतं जेव्हा मेंदू आहार पुरेसा खाल्ल्याचं सूचित करतो.
हे संकेत मिळताच पोट आणि आतड्यांमध्ये आकुंचन क्रिया होते. आवडीचे पदार्थ खातना या संकेतांकडे दुर्लक्ष केलं जातं. पण, जेवण आवडीचं नसल्यास मात्र हे संकेत दुर्लक्षित ठेवता येत नाहीत.
पोट भरल्याच्या संकेतांकडे दुर्लक्ष करणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)