अनेकदा हिरवी कोथिंबीर खरेदी केल्यानंतर २-३ दिवसांनीच खराब होऊ लागते. फ्रीजमध्ये ठेवूनही कोथिंबीर सुकते.
आज आम्ही तुम्हाला कोथिंबीर स्टोअर करण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत, ज्याला फॉलो केल्यास फ्रिजमध्ये ठेवलेली कोथिंबीर बराच काळ ताजी राहू शकते.
सर्वप्रथम कोथिंबीर नीट धुवून त्याचे पाणी काढून टाकून सुकवा. यानंतर, ते टिश्यूमध्ये गुंडाळा, प्लास्टिकच्या पिशवीत घालून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
या ट्रिकसाठी पाण्यात व्हिनेगर मिसळा, कोथिंबीरीची मुळे कापून, कोथिंबीर पाण्यात टाका आणि वर फॉइलने बांधा. दर काही दिवसांनी पाणी बदलत राहा.
याशिवाय ओल्या टॉवेलमध्येही कोथिंबीर स्टोअर करून ठेवू शकता. टॉवेलऐवजी तुम्ही सुती कापडही वापरू शकता.
कोथिंबीरीची दांडी कापून वेगळे करा. नंतर दोन टिश्यूच्यामध्ये कोथिंबीर ठेवा. एअर टाईट कंटेनरमध्ये गुंडाळा आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)