डोळ्यांच्या वेदना, जळजळ होईल कमी
डोळ्यांच्या फ्लूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. डोळ्यात लालसरपणा, वेदना, जळजळ होतेय. Eye फ्लूवर 7 घरगुती उपचाराने तुम्हाला नक्की फायदा होईल.
ग्रीन टी, कॅमोमाइल, रुईबोस आणि ब्लॅक टीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे डोळ्यांवर ग्रीन टीच्या पिशव्या वापरल्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते.
डोळ्यांच्या संसर्गावर हा सर्वात प्रभावी घरगुती उपाय आहे. सेलाइन वाटरमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत आणि यामुळेच डोळा फ्लू सारख्या डोळ्यांच्या संसर्गावर हा एक उत्तम उपाय आहे.
डोळे दुखत असल्यास, संसर्ग झाल्या असल्यास किंवा जळत होत असेल तर गरम कॉम्प्रेस लावल्याने आराम मिळतो.
थंड पाण्याच्या कॉम्प्रेसने डोळ्यांचा संसर्ग बरा होत नाही, मात्र त्याची लक्षणं कमी होण्यास मदत होते.
एरंडेल तेलामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे डोळ्याभोवती हे तेल लावल्यास फायदा होतो.
थोड्या थोड्या वेळाने डोळे थंड पाण्याने स्वच्छ करत राहा.
गुलाब पाण्याने डोळे धुतल्याने डोळ्यांचा संसर्ग कमी होतो आणि डोळ्यांतील घाण निघून जाते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)