पिगमेंटेशनमुळे चेहरा खराब झाला आहे? मग 'हे' घरगुती उपाय नक्की करून पहा

Intern
Nov 25,2024

पिगमेंटेशन काय असते?

त्वचेवर मेलॅनिनचे प्रमाण वाढल्याने चेहऱ्यावर काळे डाग पडण्यास सुरुवात होते ज्याला पिगमेंटेशन असे म्हणतात.

पिगमेंटेशनचे कारण

मेलॅनिन वाढण्याचे अनेक कारणं असतात हार्मोनल बदल , ऊन , अनुवांशिकता किंवा डायबिटीज हे मुख्य कारण असते.


घरगुती उपाय पिगमेंटेशनवर फायदेशीर असतात. अनेक घरगुती गोष्टी वापरुन तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी करू शकता.

बटाटा

आठवड्यातून दोन वेळेस बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावल्यास पिगमेंटेशन कमी होऊ लागते आणि त्वचा उजळते.

लिंबू

लिंबात व्हिटॅमिन C असल्याने चेहऱ्यावरील पिगमेंटेशन दूर होण्यास मदत होते. लिंबाच्या रसात मध घालून चेहऱ्याला लावावे.

हळद

हळद आणि दही एकत्र करून पॅक बनवावा आणि तो चेहऱ्याला लावल्यास पिगमेंटेशन कमी होते त्यासोबतच चेहरा ही चमकदार होतो.

टोमॅटो

चेहऱ्यावर टोमॅटोची पेस्ट आठवड्यातून दोन ते तीन वेळेस लावल्यास पिगमेंटेशन हळू-हळू कमी होऊ लागते, कारण टोमॅटो मध्ये अँटिऑक्सिडेंट्सचे प्रमाण भरपूर असते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही)

VIEW ALL

Read Next Story