उत्पन्न एकादशी व्रताच्या दिवशी भगवान विष्णूला पंचामृताने अभिषेक करून त्यांची पूजा करावी.
सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान विष्णूला पिवळ्या रंगाचे कपडे आणि मिठाई अर्पण करावी.
उत्पन्न एकादशीच्या दिवशी पिवळे चंदन, रोळी, अक्षत, फुले, तुळस, पाच फळे आणि धूप-दीप इत्यादी भगवान विष्णूला अर्पण करावेत.
उत्पन्न एकादशीला तुळशीची पाने तोडू नयेत आणि या दिवशी तुळशीला जल अर्पण करण्यास मनाई आहे.
यासोबतच खास करुन एकादशीला भाताचे सेवन करू नये. भात खाल्ल्यास पापाचा भागीदार होतो अशी समज आहे.
उत्पन्न एकादशीला चुकूनही तामसिक भोजन करू नये.
या विशेष दिवशी मांस आणि मद्य सेवन करण्यास मनाई आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)