भातात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं. दिवसभराची उर्जा भात खाल्ल्यानं मिळते. पांढऱ्या भाताचं भाज्या, डाळी, सोयाबीनने पौष्टीक वाढतं.
भात खाल्ल्यानं वजन वाढतं म्हणून बरेच लोक वजन कमी करण्यासाठी पांढरे तांदूळ खाणं टाळतात.
दक्षिण भारतात बऱ्याचश्या ठिकाणी पॉलिश न केलेला साधा भात खातात. तरीही त्यांच वजन वाढत नाही.
जर तुम्ही भात शिजवताना 'या' चुका टाळल्यात तर वजन नक्कीच वाढणार नाही.
दोन ते तीनवेळा पॉलिश केलेला तांदूळ खाणं शक्यतो टाळा.
भात व्यवस्थित शिजवा आणि भातावरील फेस आलेलं पाणी काढून भात खा.
भात कुकरमध्ये शिजवू नका. पातेल्याचा वापर करा.
दक्षिण भारतात लोकं भात शिजवण्यासाठी कुकरचा वापर न करता पातेल्याचा वापर करतात.
वेट लॉससाठी रात्री न भात खाता दुपारच्यावेळी भात खाऊ शकता.