मासिक पाळी वेळेवर येत नाही? असू शकतात 'ही' कारणे

मासिक पाळी वेळेत न येणे ही अनेक महिलांची समस्या आहे. पाळी अनियमित असेल तर त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळं त्यावर योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.

Mansi kshirsagar
Sep 07,2023


मासिक पाळी अनियमित का होते यामागे अनेक कारणे असू शकतात, जाणून घेऊया सविस्तर


ताण-तणाव असल्यास त्याचा शरीरावर व मनावरही गंभीर परिणाम होतात. तणाव हे मासिक पाळी अनियमित होण्याचे मुख्य कारण आहे.


वजन नियंत्रणात ठेवणे हे निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असते. वजन वाढल्यास पाळीदेखील अनियमित होऊ शकते.


पौष्टिक गुणधर्माची कमतरता असल्यास पाळी अनियमित होऊ शकते. त्यामुळं आहारात आयर्न असलेले पदार्थ घेणे गरजेचे आहे.


व्यायाम हा निरोगी शरीरासाठी खूप महत्त्वाचा असतो. मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी व्यायाम नियमित करा.


महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. त्याचा परिणाम मासिक पाळीवर होत असतो.

VIEW ALL

Read Next Story