दूध आणि तुपाचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात. तुपात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट आहेत. त्यामुळं दुधात तूप मिसळून प्यायल्यास दुप्पट फायदे मिळतात.
दुधात तूप मिसळून प्यायल्याने शरीरातील एंजाइम्स रिलीज होतात, ज्यामुळे पचनशक्ती वाढते.
रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम दुधात तूप टाकून प्यायल्यास मेंदूच्या नसा शांत होतात. चांगली झोप येण्यासही मदत होते. तणाव कमी होतो आणि मूडही चांगला राहतो.
निरोगी त्वचेसाठी दूधात तूप मिसळून प्या. त्यामुळं त्वचेला अनेक फायदे होतात. रोज दुधात तूप मिसळून प्यायल्यास वृद्धत्व कमी होते आणि कोरडेपणाही जातो.
सांधेदुखीचा त्रास होत असेल तर तूप आणि दुधाचे सेवन जरूर करावे. दूध जॉइंटमध्ये इन्फ्लामेशन कमी करते
सर्दी-खोकला दूर करण्यासाठी रोज तूप आणि हळद मिसळून दूध प्या. यामुळे तुम्हाला लवकरच आराम मिळेल.
छातीतून कफ बाहेर काढण्यासाठी दूध आणि तुपाचे सेवन करणे देखील आरोग्यासाठी आरोग्यदायी मानले जाऊ शकते.