उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही ऋतूमध्ये येणाऱ्या या फळामध्ये औषधी गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात.आयुर्वेदानुसार, जांभळाध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.
आरोग्याविषयीच्या अनेक समस्या जांभळाची पानं खाल्ल्याने दूर होतात.तुम्हालादेखील या समस्या आहेत तर जांभळाचा पानांच सेवन नक्की करा.
मधूमेहाच्या रुग्णांनी जांभळाची पानं खाण फायदेशीर मानलं जात.यामध्ये असलेले अँटी-हायपरग्लाइसेमिक गुणधर्म साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात. तुम्ही त्या पानांपासून चहा बनवू शकता किंवा सकाळी रिकाम्या पोटी चावून खाऊ शकता. ज्यांच्या रक्तात साखरेचे प्रमाण कमी आहे त्यांनी ही पानं खाणं टाळावीत.
जांभळाच्या पानांच सेवन हृदयाच्या समस्या कमी करण्यासाठी मदत करते. त्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहते आणि हृदयाचे आरोग्यदेखील सुधारते.
दात आणि हिरड्यांचा समस्या किंवा श्वासाची दुर्गंधी यावर जांभळाची पानं खाणं फायदेशीर आहे. तोंडात फोड आल्यास जांभळाची पानं पाण्यात उकळून त्यावर लावू शकता.
जर तुम्हाला पचनाचा त्रास नेहमी होत असेल तर जांभळाच्या पानांच सेवन करण फायदेशीर ठरते. यामध्ये असलेले औषधी गुणधर्म पचनशक्ती मजबूत करण्यास मदत करते त्याचबरोबर अपचन, जुलाब, अॅसिडिटी यांसारख्या समस्यांपासून देखील आराम मिळतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)