ठेवण्यापूर्वी आणि नंतर पुरुषांनी 'या' 7 गोष्टी करणे आवश्यक
तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संबंध बनवण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या, तरच तुम्ही निरोगी लैंगिक जीवन (Healthy Sex Life) जगू शकता.
पण अनेक पुरुष सेक्स करण्यापूर्वी आणि नंतर या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. कारण फक्त आळशीपणा आणि निष्काळजीपणामुळे...
संभोगानंतर लघवी करणे केवळ महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठीही आवश्यक आहे. कारण प्रायव्हेट पार्ट्स निरोगी ठेवण्यासाठी हे करणे आवश्यक आहे.
सेक्स करण्यापूर्वी तुम्ही जेवू शकता. पण संबंध बनवणं आणि खाणं यात वेळेचं अंतर ठेवावं. अन्न खाल्ल्यानंतर लगेच संभोग करू नका. कारण यामुळे पोटाशी संबंधित गंभीर आजार होऊ शकतात.
सेक्स केल्यानंतर तुम्हाला थोडे अशक्त वाटू शकतं. काही वेळानंतर तुम्ही 1 ते 2 ग्लास पाणी किंवा हवे तितके पिऊ शकता. याशिवाय तुम्ही दूधही पिऊ शकता. मात्र काही खाण्याचा विचार करु नका. केळी खाऊ नका. दही खाल्ल्यास चालतं.
अनेक पुरुष सेक्स केल्यानंतर कंडोम बेडच्या खाली किंवा शेजारी ठेवतात. पण ही पद्धत चुकीची आहे. यामुळे घरातील इतर सदस्यांना संसर्ग होऊ शकतो.
बरेच लोक संभोग करताना अंडरवेअर काढतात पण नंतर तीच अंडरवेअर घालतात. पण हे करू नका. कारण फोर प्ले करताना प्रायव्हेट पार्ट्समधून हार्मोन्स बाहेर पडतात, त्यामुळे तेच कपडे घालून झोपू नका.
अनेक लोक सेक्स केल्यानंतर आपल्या पार्टनरला सोडून एकटे झोपतात. ही पद्धत चुकीची आहे. याचा तुमच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो.
संभोगाच्या वेळी तुम्ही तुमचे कपडे जरी काढले असतील, पण दुसऱ्या दिवशी तेच कपडे घालून बेडरूममध्ये जाऊ नका. स्वच्छता बाळगणे गरजेचं आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)