हिंग पावडर एक चमचा आणि जिरे पावडर एक चमचा आणि गुळ दोन चमचे एकत्र करून त्याच्या लहान गोळ्या करुन ठेवाव्यात. या गोळ्या दिवसातून 3-4 वेळा चघळून खाव्यात.
मासिक पाळी आधी दोन-तीन दिवसांपासून रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यातून एक चमचा त्रिफळा चूर्ण घ्यावे.
हिरव्या भाज्या कोथिंबीर, पालक,बटाटा, सफरचंद, चिकू इ. फळे यांसारख्या जीवनसत्त्व ‘ब’असणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. फळे सालीसहित खायला हवीत, तसेच सालीसहित डाळींचा वापर करावा.
मीठ खाण्याचे प्रमाण कमी करावे. मीठाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरामध्ये अनावश्यक पाणी साठून राहते आणि पाळीच्या काळातील वेदना वाढण्याची शक्यता असते.
रोजच्या आहारात गोड पदार्थांचे प्रमाण कमी करा. आहारातल्या कॅलरीचे प्रमाण वाढल्यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि त्याचा परीणाम म्हणजे मासिक पाळीच्या काळात वेदना होण्याचे प्रमाण वाढते.
रोजच्या आयुष्यात काही सोपे बदल केले तर पाळी दरम्यान होणारा हा त्रास कमी होण्याची शक्यता असते. पाहूया त्यावर कोणते उपाय आहेत.
मासिक पाळी येण्याच्या आधीपासूनच पाठदुखी, पायात गोळे येणे अशा समस्या सुरू होतात. पण जेव्हा पाळी येते तेव्हा पोटात कळा येणे, कंबर दुखणे, थकल्यासारखे वाटणे अशा समस्या उद्भवतात.
मासिक पाळी जवळ आली की महिलांना अक्षरशः नको होते. अनेकांना हा दिवस नकोसा वाटतो. याचे कारण म्हणजे शरीरातील हार्मोनल बदल आणि त्यामुळे होणारा शारीरिक त्रास.