रात्रीच्या जेवणात किती चपात्या खाव्यात? महिला- पुरुषांसाठी वेगळं आहे प्रमाण


दुपारच्या तुलनेत रात्रीचं जेवण हलकं आणि कमी असावं, असं तज्ज्ञांकडून कायमच सांगितलं जातं.


अनेकांना रात्रीच्या जेवणात चपाती खायची सवय असते.


पण तुम्हाला माहितेय का ? रात्रीच्या जेवणात जास्त चपात्या खाल्याने याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.


तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, स्त्रियांनी 2 तर पुरुषांनी 3 चपात्या खाव्यात.


जर तुम्ही या पेक्षा जास्त चपात्या खात असाल तर, तुमचं वजन झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.


चपात्यांमध्ये कॅलरीज जास्त आढळतात, त्यामुळे त्या पचायला जड जातात.


रात्री चपात्या खाल्याने रक्तातील साखर वाढते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी रात्रीच्या जेवणात चपात्या खाणं टाळावं.


रात्रीच्या वेळी चपाती खाल्ली तर ती लवकर पचत नाही, त्यामुळे निद्रानाशाची समस्या वाढते.


अपचनामुळे गॅसची समस्या जाणवते, त्यामुळे रात्रीच्या जेवणात चपात्या खाणं टाळावं.


याशिवाय निरोगी आरोग्यासाठी रोज सकाळी उठल्यावर चालायला जाणं हा चांगला व्यायाम आहे. यामुळे बऱ्याच शारीरिक व्याधी दूर होतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story