शरीराप्रमाणेच केसांचीही नियमित काळजी घ्यावी. अनेक लोकांना असे वाटते की केस धूणं म्हणजे फक्त शॅम्पूचा वापर करने तर असं नसतं.
अनेक लोक विरळ आणि गळणाऱ्या केसांमुळे खूप कंटाळले आहेत. केसात घाण अर्थातच कोंडा जमा होतो जो काढणे कठीण असतं.
केस व्यवस्थित न धुतल्यानं केसांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या होतात.
तुमचे केस कोरडे किंवा कुरळे असतील तर तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा केस धुवावेत.
ज्याचे केस तेलकट असतील त्यांनी केस दररोज धुवावेत.
गरम पाण्यानं केस धुतल्यास केस गळण्याची शक्यता आहे.
अँटी डँड्रफ किंवा सल्फेट असलेले शॅम्पू वापरल्याने केसांना हानी पोहचू शकते.
कोरड्या केसांमुळे अनेकदा कोंडा किंवा खाज येते ज्यामुळेही केस गळू शकतात.
जर तुमचे केस कोरडे किंवा तेलकट नसतील तर आठवड्यातून 1-2 वेळा तेल लावणे चांगले असते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)