वयानुसार दिवसात किती तूप खायला पाहिजे?
तुपाचे सेवन आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर मानलं जातं.
पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नसतो.
तुमच्या वयानुसार किती प्रमाणात तूप योग्य जाणून घ्या.
4-5 वर्षे वयोगटातील मुले आणि किशोरवयीन म्हणजेच 18 वर्षांपर्यंतच्या मुलांनी दिवसभरात 2 ते 3 चमचे देशी तूप घ्यावे. याने त्यांच्या शरीराला 15-20 ग्रॅम 'तूप' मिळेल.
18-45 वर्षे वयोगटातील लोकांनी 1 ते 2 चमचे देशी तूप घ्यावे. याने तुमच्या शरीराला 10-12 ग्रॅम 'तूप' मिळेल.
45-60 आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांनी 1 चमचे तूप घ्यावे. याने शरीराला 8-10 ग्रॅम 'तूप' मिळेल. या तुपामुळे हाडे मजबूत आणि गुळगुळीत राहतील.
गरोदर स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी 2 ते 3 चमचे (15-20 ग्रॅम) देशी तूप घ्यावे. यामुळे आईच्या दुधाची गुणवत्ता सुधारेल.
जरी तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तरी तुम्ही तुपाचे सेवन पूर्णपणे सोडू नये. अशा परिस्थितीतही तुम्ही रोज किमान 1 चमचा 'तूप' खावे. तुमच्या शरीराला याची खूप गरज असते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)