मीठाशिवाय अन्नाला चव नाही. चिमूटभर मीठ जेवणाची चव तर वाढवतेच तर कधी त्याची चवही खराब करते.
या कारणामुळे जास्त खाणे आणि मीठ कमी खाणे दोन्ही हानिकारक आहे.
जास्त मीठ खाल्ल्याने अनेक पद्धतीने शरीराला हानी पोहचू शकते. यामुळे एका दिवसात किती मीठ खावे हे जाणून घेऊयात.
भारतातील लोक दररोज सरासरी 10-15 ग्रॅम मीठ वापरतात. जास्त मीठ खाल्ल्याने तुमचे बीपी वाढते. याशिवाय यामुळे इतर शारीरिक समस्या होतात.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, प्रौढ व्यक्तीने दररोज 5 ग्रॅम (1 चमचे) पेक्षा जास्त मीठ खाऊ नये.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)