मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाची चव चांगली लागत नाही. त्यामुळे रोजच्या जेवणात मीठ असतेच.
आपल्या शरीराच्या चांगल्या कार्यासाठी मीठ म्हणजेच सोडियम खूप महत्वाचे आहे, परंतु तुम्हाला हे माहित आहे का की त्याचे अतिसेवन तुम्हाला अनेक गंभीर आजारांना बळी पाडू शकते?
होय, जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब, हृदयविकार, स्ट्रोक, हृदय आणि मूत्रपिंडाचा त्रास यांसारख्या गंभीर समस्या होऊ शकतात.
अशा परिस्थितीत, WHO एका दिवसात किती मीठ खावे याबद्दल सांगितले आहे. याबद्दल जाणून घेऊयात.
WHOच्या एका नवीन अभ्यासानुसार, दररोज 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाल्ल्यास पुढील 10 वर्षांत हृदयविकार आणि मूत्रपिंडाच्या तीव्र आजारामुळे सुमारे 3 लाख मृत्यू टाळता येऊ शकतात.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)