पावसात पायाला येणारे रिंकल्स कसे घालवायचे?

पावसाळ्यात अनेक लोक पायाच्या संसर्गामुळे त्रस्त असतात. या संसर्गामुळे त्वचा सहज खराब होते आणि त्यावर पुरळ उठते. याशिवाय तुम्हाला सतत खाज आणि जळजळ होते, जे फार काळापर्यंत त्रास देतात.

Jul 20,2023

इंफेक्शनपासून वाचण्यासाठी 'या' चार गोष्टी करा

इतकंच नाही, तर हा संसर्ग तुमच्या दुसऱ्या पायालही होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत काही गोष्टींचं पालन करत तुम्ही हा संसर्ग टाळू शकता.

झोपण्यापूर्वी पायांना राईचं तेल लावा

झोपण्यापूर्वी पायांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. पावसाळ्यात राईचे तेल गरम करून पायांना लावा.

बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध

राईचे तेल बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतं, जे बुरशीजन्य संसर्गापासून पायांचे संरक्षण करण्यात मदतशीर ठरतं.

कोमट पाण्यात आणि मीठात पाय भिजवा

गरम पाण्यात मीठ मिसळा आणि त्यात आपले पाय भिजवा. यासह पाय चांगले घासा. यामुळे ते आतून स्वच्छ राहतात आणि संसर्ग टळतो.

ओल्या चपला-बूट घालणं टाळा

पावसाळ्यात लोक आपल्या चपला, शूज यांची नीट काळजी घेत नाहीत. पण हे संसर्गासाठी कारणीभूत ठरु शकतं.

खाज, जळजळ

फंगल इंफेक्शन तुमच्या पायाला खातं आणि नंतर खाज, जळजळ निर्माण करतं. त्यामुळे ओल्या चपला, शूज घालणं टाळा. वेळोवळी त्या साफ करा. घालण्याआधी ते सुकवा.

पाय सुके ठेवा

पाय सुके ठेवणं तुमचा फंगल इंफेक्शनपासून बचाव करतं. पावसाच्या पाण्यात आपले पाय आणि बोटं सतत ओली राहणार नाहीत याची काळजी घ्या.

संसर्ग दुसऱ्या पायालाही होऊ शकतो

कारण एकदा एका बोटाला संसर्ग झाला तर तो आजुबाजूलाही पसरतो आणि तुम्हाला त्रास होऊ शकतो.

VIEW ALL

Read Next Story