भारतातील हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीरच्या पर्वतात आढळणारी गुच्छी या भाजीला जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
ही भाजी तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्हाला तब्बल 30 ते 35 हजार रुपये मोजावे लागतील.
गुच्छी ही मशरुमची एक दुर्मिळ प्रजातीची भाजी आहे.
या भाजीची शेती करता येत नाही ती नैसर्गिकरित्या डोंगराळ प्रदेशात उगवते. पर्वतावर चढून ही भाजी जीव धोक्यात घालून आणावी लागते. त्यामुळे ही भाजी महाग असते.
गुच्छी भाजी अत्यंत औषधी असून तिचे रोज सेवन केल्यास हृदयरोगपासून बचाव होतो अशी मान्यता आहे.
अमेरिका, युरोप, फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंडम या देशामध्ये गुच्छी भाजीची सर्वात जास्त मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील गुच्छी ही भाजी आवडते.