संक्रांत हा सण आहे क्रिंकांत हा विजयोत्सव आहे?
पौष मासात मकर संक्रांती वगळता अन्य मोठे सण नसल्यामुळे या मासाला भाकडमास असे म्हणतात.
नवीन वर्षातील मकर संक्रांत हा पहिला सण आहे. जो तीन दिवस साजरा केला जातो.
भोगी, मकर संक्रांत आणि क्रिंक्रांत असे तीन दिवस हा सण साजरा केला जातो.
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला 'भोगी' म्हणतात. भोगी म्हणजे उपभोगाचा दिवस.
या दिवशी अभ्यंगस्नान करुन भोगीची भाजी, तीळ घातलेली बाजरीची भाकरी, खिचडी, लोणी असा नैवेद्य दाखवतात.
मकर संक्रांतीला एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत ज्या काळात प्रवेश करतो.
धार्मिक व्रत विधी करण्यासाठी पुण्यकाळ म्हटले आहे. मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यालाच उत्तरायण असेही म्हणतात.
तिळ गुळ घ्या, गोड गोड बोला असा संदेशही दिला जातो.
मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हणतात. या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला, म्हणून हा दिवस आनंदोत्सवासारखा साजरा केला जातो.