आजकाल बाजारात मिळणारा ब्राऊन ब्रेड हा आरोग्यदायी मानला जातो आणि आवर्जून खाल्ला जातो.
पण हा प्रश्न पडतो की पांढऱ्या ब्रेडपेक्षा ब्राऊन ब्रेड खरोखरच आरोग्यदायी आहे का?
चला आज या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेऊयात. जे जाणून चुकूनही तुम्ही तुमच्या आरोग्याशी खेळणार नाही.
ब्राऊन ब्रेडचे फायदे असूनही, प्रत्येक ब्राऊन ब्रेड हेल्दी असेलच असे नाही.
बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक ब्राऊन ब्रेडमध्ये रिफाइंड मैदा, साखर, प्रिझर्व्हेटिव्ह आणि केमिकल रंग घातलेले असतात, ज्यामुळे त्याची पौष्टिक मूल्ये कमी होतात.
काही ब्रँड ब्रेडला गडद रंग देण्यासाठी कारमेल किंवा इतर रंग वापरतात. ज्यामुळे ब्रेड ब्राऊन ब्रेडसारखा दिसतो, परंतु खरं तर तो पांढऱ्या ब्रेडपेक्षा फारसा वेगळे नसतो.
याच कारणामुळे ब्राऊन ब्रेडही हेल्दी राहत नाही. त्यामुळे ब्राऊन ब्रेड खरेदी करताना काळजीपूर्वक निवड करा.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)